Pimpri : पिंपरीतील मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था

एमपीसी न्यूज – नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांनी विरोध केला आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी मुस्लिम बांधव तसेच विविध संघटना आज, शुक्रवारी (दि. 20) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमणार आहेत. यावेळी येणा-या नागरिकांची वाहने पार्क करण्यासाठी वाहतूक विभागाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. तर या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला देशभरात विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन केले जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील आयोजकांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातून नागरिक एकत्र येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या वाहनांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

खालील ठिकाणी पार्किंग करता येईल –

# नेहरू नगर,यशवंत नगर मार्गे येणाऱ्यांसाठी – एच ए ग्राउंड

_MPC_DIR_MPU_II

# नाशिक फाट्याकडून पिंपरी चौकाकडे येणाऱ्यांसाठी – साई चौककडे जाणाऱ्या रस्त्या लगतची मोकळी जागा

# निगडीकडून येणाऱ्यांसाठी – पिंपरी-चिंचवड महापालिका आउट गेट ते गांधीनगरकडे जाणारा रस्ता

# केएसबी चौकाकडून सम्राट चौकाकडे येणाऱ्यांसाठी – सम्राट चौक येथील पिंपरी-चिंचवड महापालिका मैदान

# चारचाकी वाहनांसाठी – महिंद्रा ऑटोमोटीव कंपनीची मोकळी जागा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.