BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पार्थ अजितदादांचा पुत्र , तर मी काम करणारा कार्यकर्ता – श्रीरंग बारणे

5,837
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. गेली 25 वर्षे आपली नाळ सर्वसामान्यांशी जोडली गेली आहे. मी लोकांच्या मनातील खासदार आहे. तर, अजितदादांचा पुत्र अशी पार्थ पवार यांची ओळख आहे. कोणी फलकबाजी करून नेता होत नाही. पवार घराण्यातील कोणही उमेदवार असला तरी मावळचा पुढचा खासदार मीच असणार असा विश्वास शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

.

महापालिकेत आज (गुरुवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन भोसले, निलेश बारणे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, महिला संघटिका उर्मिला काळभोर, सरिता साने, अनिता तुतारे उपस्थित होते.

2019 मध्ये मावळात शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. पवार घराण्यातील कोणही उमेदवार असला तरी शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल. आपण सातत्याने 25 वर्ष लोकांमधून निवडून येत आहे. आपल्याला लोकांचे पाठबळ लाभले आहे. त्यामुळे पार्थ पवार यांची आणि आपली तुलना करणे गैर आहे, असेही खासदार बारणे म्हणाले.

शिवसेना-भाजपची युती होईल की नाही याचा सर्वस्वी निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. याबाबत कोणतेही भाष्य करायचे नाही. आपण निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असेही ते म्हणाले.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: