BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: शहरातील विकासकामांची पार्थ पवारांनी केली पाहणी; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

466
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – मावळ मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे चर्चेत असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी आज (सोमवारी) पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी साधला संवाद

त्यांच्यासमेवत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वषें सत्ता होती. राष्ट्रवादीच्या कार्यकाळात झालेल्या या विकासकामांची पार्थ यांनी पाहणी केली. शहराला पाणीपुरवठा करणारे निगडीतील जलशुध्दीकरण केंद्र, दुर्गादेवी टेकडी यासह विविध ठिकाणी भेटी देऊ शहराची विविध माहिती घेतली.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.