Pimpri: रुग्ण वाढताहेत ‘अलर्ट’ रहावे लागेल, अतिरिक्त ‘स्वॅब’ तपासणी सुविधेसाठी सरकारकडे विनंती करु – देवेंद्र फडणवीस

Patients are on the rise, need to be 'alert', request government for additional 'swab' examination facility - Devendra Fadnavis

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कोरोना आटोक्यात राहण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. त्याला काही प्रमाणात यशही येत आहे. आत्ताची परिस्थिती बघता ज्या वेगाने रुग्ण वाढ होत आहे. त्यासाठी फार अलर्ट रहावे लागेल. अधिक मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. पावसाळ्यात रुग्ण वाढतील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने महापालिकेकडून तयारी केली जात आहे. अतिरिक्त नमुने (स्वॅब) तपासण्याची सुविधा पालिका उभी करत आहे. त्याहीपेक्षा अधिकची आवश्यकता असेल, तर मी स्वत: माहिती घेऊन शासनाकडे तशी विनंती करेल, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस यांनी आज (मंगळवारी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. आयुक्त श्रावण हर्डीकर आणि वायसीएमएचचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याकडून शहरातील कोरोना परिस्थिती, केल्या जाणा-या उपाययोजनांची माहिती घेतली.

त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, महापालिका हद्दीत कोरोनाची लढाई कशी चालली आहे. विशेषत रुग्णालयाचे व्यवस्थापन कशाप्रकारे चालले आहे. कोणत्या प्रकारचे रुग्ण येतात. त्याची माहिती घेतली आहे. वेगवेगळे प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालले आहेत. काही प्रमाणात यशही येत आहे.

आत्ता गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात रुग्ण वाढत आहेत. पावसाळ्यात रुग्ण वाढतील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने महापालिकेकडून तयारी केली जात आहे. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बेड उपलब्ध असतील.

रुग्ण नियोजन चांगल्या प्रकारे करता येईल. असा प्रयत्न चालला आहे. महापालिकेने तयार केलेला डॅशबोर्ड चांगला आहे. त्याच्या माध्यमातून व्यवस्थापन करणे सोपे जाईल.

तथापि, आत्ताची महाराष्ट्रातील एकूण परिस्थिती बघता ज्या वेगाने रुग्ण वाढ होत आहे. त्यासाठी फार अलर्ट रहावे लागेल. अधिक मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. त्यादृष्टीने कामकाज करावे लागेल.

अतिरिक्त नमुने तपासण्याची सुविधा पालिका उभी करत आहे. त्याहीपेक्षा अधिकची आवश्यकता असेल. तर मी स्वत: माहिती घेऊन शासनाकडे तशी विनंती करेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.