Pimpri: ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत रुग्ण वाढले, ‘फ’ रेडझोन तर ‘ब’ क्षेत्रीय प्रभाग कोरोनामुक्त; आपल्या प्रभागात किती रुग्ण?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांपैकी सात क्षेत्रीय प्रभाग कार्यालयांच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या संभाजीनगर, मोहननगर, आकुर्डी, प्राधिकरण परिसर असलेल्या ‘अ’ प्रभागात कोरोनाचे नऊ रुग्ण आढळले आहेत. तर, तळवडे, रुपीनगर परिसर येत असलेल्या कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ झालेल्या ‘फ’ क्षेत्रीय प्रभागात रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. या प्रभागात सर्वाधिक 37 रुग्ण आहेत. भोसरी, दिघी, चऱ्होली, बोपखेल हा भाग येत असलेल्या ‘इ’ क्षेत्रीय प्रभागात आता केवळ नऊ रुग्ण आहेत. तर, रावेत,  बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड परिसर येत असलेला ‘ब’ क्षेत्रीय प्रभाग पहिल्यापासून कोरोनामुक्त आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. दररोज शहराच्या विविध भागात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 167  जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. कोरोनामुक्त झालेल्या संभाजीनगर, मोहननगर, आकुर्डी, प्राधिकरण परिसर येत असलेला ‘अ’ प्रभागात नऊ रुग्ण आढळले आहेत.  कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या ‘फ’ प्रभागात सर्वाधिक 37 रुग्ण आहेत. तर, ‘इ’ प्रभागातील रुग्ण संख्या कमी होऊन नऊवर आली आहे.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय रुग्ण संख्या!

‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर,   मोहननगर, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात नऊ रुग्ण.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत,  बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड, काळेवाडी भागात पहिल्यापासून कोरोनाचा एकही रुग्ण नाही.

‘क’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी), धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे नऊ रुग्ण आहेत.

‘ड’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे 13 रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात कोरोनाचे नऊ रुग्ण आहेत.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली,  कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर,  यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या भागात ( कोरोनाचे सर्वाधिक 37 रुग्ण आहेत. हा प्रभाग कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. प्रभागातील रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे पाच रुग्ण आहेत.

‘ह’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, दापोडी,फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे आठ रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.