BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प 2011 पासून प्रलंबित आहे. हा प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व पक्षीय राजकीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. ही योजना मार्गी लागण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहराची लोकसंख्या सरासरीच्या पटीने अधिक वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी, आंद्रा-भामा आसखेड प्रकल्पाला गती देणे आवश्यक आहे. वाढत्या लोकसंख्येचा अंदाज घेऊन सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. महापालिका पवना धरणातून दिवसाला 500 एमएलडी पाणी उचलत आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येला हा पाणीपुरवठा कमी आहे. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत वाढविणे आवश्यक आहे.

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मागील 11 वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. पवना थेट पाईपलाईनचे काम पुनश्च सुरु करुन दोन वर्षात पूर्ण केल्यास पाणी उपलब्धतेमध्ये वाढ होणार आहे. त्यासाठी सर्वपक्षीय राजकीय लोकप्रतिनीधींना पुढाकार घेणे गरजेचे आहे. लोकप्रतिनीधी आणि प्रशासनाने एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असेही आयुक्त हर्डीकर म्हणाले.

HB_POST_END_FTR-A2

.