Pimpri : कराचा भरणा करा, अन्यथा जप्तीची कारवाई; महापालिकेचा इशारा

जप्तीपूर्वीची नोटीस बजावल्यानंतर सात दिवसाच्या आत कराची रक्कम भरण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील थकबाकीदार असलेल्या मालमत्ताधारकांनी जप्ती पूर्वीच्या नोटीसा बजाविल्यानंतरही 7 दिवसाच्या आत मिळकतकराची रक्कम भरणा केलेली नाही. अशा मालमत्ताधारकांवर मिळकत जप्तीची कार्यवाही करण्यात येत आहे. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी तात्काळ थकबाकीसह कराची रक्कम भरावी असे आवाहन, कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील करसंकलन विभागाकडे 5 लाख 6 हजार 927 मालमत्तांची महापालिकेकडे नोंद आहे. त्यापैकी 2,90,316 मालमत्ताधारकांनी 397.50 कोटी मिळकतकराचा भरणा केला आहे. कर संकलन विभागामार्फत ज्या मालमत्ताधारकांकडे थकबाकी आहे, अशा 80,000 मालमत्ताधारकांना जप्ती पूर्वीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मिळकत कराची थकबाकी असणा-या मालमत्ताधारकांनी जप्ती पूर्वीच्या नोटीसा बजाविले नंतरही 7 दिवसाच्या आत मिळकत कराची रक्कम भरणा केलेली नाही. अशा मालमत्ताधारकांच्या मिळकतीची जप्तीची कार्यवाही करण्यात येत आहे.

जे मालमत्ताधारक नोटीस बजावूनही मिळकत कराची थकबाकी भरणार नाहीत, अशा मालमत्ताधारकांच्या मिळकतींवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतूदीनुसार जप्ती किंवा अटकावून ठेवण्याची कारवाई करण्यात येणार आहे. करसंकलन विभागाकडे 5,06,927 मिळकतीची नोंद असून त्यापैकी 2,90,316 मालमत्ताधारकांनी 397.50 कोटी मिळकतकराचा भरणा केला आहे. सर्व मालमत्ताधारकांकडून मिळकत कर वसूल करण्याचे दृष्टीने मिळकत जप्तीची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी मिळकत कराचा भरणा करुन जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन, कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त आष्टीकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.