Pimpri: थकित मालमत्ता कराचा भरणा करा अन् भरघोस सवलत मिळवा; आकुर्डीत शनिवारी लोकअदालत

थकित मालमत्ता कराच्या दंडावर मिळणार 90 टक्के सवलत

एमपीसी न्यूज – थकित मालमत्ता कराची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी महापालिकेतर्फे येत्या शनिवारी (दि. 14) लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये थकित मालमत्ता कराच्या दंडावर (शास्ती) 90 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त थकबाकीसह संपुर्ण मिळकतकराचा एक रक्कमी 50 टक्के भरणा केल्यानंतर भरण्यापर्यंत आकारण्यात आलेल्या विलंब दंडात 45 टक्के सवलत देण्यात येणार आहे. लोकअदाली अंतर्गत तडजोडीकरिता 3 हजार 733 थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

आकुर्डीतील उर्दु माध्यमिक विद्यालयात शनिवारी (दि. 14) सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ही लोकअदालत होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशासनुसार आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशावरुन राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी आणि तत्सम प्रलंबित तडजोड योग्य प्रकरणे मार्गी लावली जातात. मालमत्ता कर, पाणीपट्टी संबंधातील प्रकरणाचा न्यायालयामार्फत निवाडा करण्यात येतो.

_MPC_DIR_MPU_II

विहित मुदतीत मालमत्ता कराचा भरना न केल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील अनुसूची ‘ड’ प्रकरण 8 मधील नियम 41 नुसार प्रतमिहिना दोन टक्के महापालिका शास्तीकर आकरण्याची तरतूद आहे. थकबाकीदार मालमत्ता धारकांकडून वर्षानुवर्षे मालमत्ता कराचा भरणा होत नाही. त्यामुळे मालमत्ताकराचे थकबाकीदार दिवसें-दिवस वाढत आहेत. अशा प्रकरणांची लोकअदालतीमध्ये तडजोड केली जाणार आहे.

लोकअदाली अंतर्गत तडजोडीकरिता 3 हजार 733 थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. लोकअदालतमध्ये तडजोडीअंती थकबाकीसह संपूर्ण मालमत्ता कराचा एक रकमी भरणा करणा-या मालमत्ता धारकांना महापालिका मालमत्ता कराच्या दंडावर (शास्ती) 90 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

त्याव्यतिरिक्त थकबाकीसह संपुर्ण मिळकतकराचा एक रक्कमी 50 टक्के भरणा केल्यानंतर भरण्यापर्यंत आकारण्यात आलेल्या विलंब दंडात 45 टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत अैवध बांधकाम शास्ती करामध्ये नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. थकीत मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा करुन सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या कर संकलन विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.