Pimpri : पीसीईटीच्या रेडीओचा ‘कम्युनिटी रेडिओ एक्सेलन्स’ पुरस्कार देऊन गौरव 

एमपीसी न्यूज – नवी दिल्ली, युनेस्को भवन येथे “कम्युनिटी रेडिओ एक्सेलन्स 2023” या गौरव सोहळ्यात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 एफएम चा ‘ (Pimpri) नाविन्यपूर्ण संवाद पद्धती’ (INNOVATIVE COMMUNICATION PRACTICES) या श्रेणीअंतर्गत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी दळणवळण आणि माहिती सल्लागार, साऊथ आफ्रिका, युनेस्को हिझेकील डलामिनी,  संचालक, CEMCA डॉ. बी. शद्रच , निवड समितीचे अध्यक्ष प्रा. अशोक ओग्रा , अतिरिक्त संचालक, सीआरएस, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार गौरीशंकर केसरवाणी आदी उपस्थित होते.

Lalit Patil : ललित पाटील प्रकरणी येरवडा कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी अटकेत

इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या निर्मिती प्रमुख माधुरी ढमाले व कार्यक्रम अधिकारी विराज सवाई यांनी पुरस्कार स्वीकारला. आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशिया, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अनेक उपक्रमांचे आयोजन केले होते.

या उपक्रमाचे उत्कृष्ठ सादरीकरण केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. पीसीईटीचे डिजिटल मार्केटिंग प्रमुख डॉ. केतन देसले यांनी त्यावेळी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून उत्कृष्ठ नियोजन केले होते. योगाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भारतभरातील सुमारे 200 कम्युनिटी रेडिओंनी या उपक्रमात भाग घेतला होता. यापैकी 20 रेडिओंच्या प्रभावी योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन (Pimpri)  केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.