Pimpri: उन्हाळा आला… बंद जलतरण तलाव 15 दिवसांत सुरू करा – अतिरिक्त आयुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवलेल्या तलावांची सर्व कामे त्वरीत पूर्ण करून 15 दिवसांत हे तलाव नागरिकांसाठी खुले करावेत, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी महापालिकेच्या स्थापत्य आणि विद्युत विभागास दिल्या आहेत. तसेच या जलतरण तलावांवर क्लोरीनेटर यंत्रणाही तत्काळ बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महापालिकेचे मोहननगर, भोसरी आणि थेरगाव येथील जलतरण तलाव देखभाल दुरूस्ती तसेच स्थापत्य आणि विद्युत विभागाच्या काही कामांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. उन्हाळा सुरू होत असून नागरिक उन्हाळ्यामध्ये जलतरण तलावात पोहण्यासाठी येतात. या पार्श्वभूमीवर मंगळवारी ( दि. 3) अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी स्थायी समितीच्या सभागृहामध्ये बैठक घेतली. उपमहापौर तुषार हिंगे, सहायक आयुक्त संदीप खोत, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, प्रदीप पुजारी, एस. एस. वहिकर, संजय खाबडे बैठकीस उपस्थित होते.

जलतरण तलावाबाबत काही स्थापत्य व विद्युतविषयक कामे असल्यास ती तातडीने  पूर्ण करावीत. उन्हाळा सुरू झाला असून येत्या 15 दिवसात सर्व कामे पूर्ण करून बंद असलेले जलतरण तलाव सुरू करावेत. तसेच जलतरण तलावावर क्लोरीनेटर यंत्रणा बसविणे काम पूर्ण करावेत. या बरोबरच तलावांवर सुरक्षीतेतसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत करावी, अशा सूचना पवार यांनी केल्या.

 

विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर

त्याचप्रमाणे ‘येत्या मे महिन्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिर 2020 आयोजित करण्याचे नियोजन आहे. या शिबिरात जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या महापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धेतील एकूण 20  खेळांचा समावेश करण्यात येणार आहे. हे शिबिर सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास असे दोन सत्रात आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिर अनुषंगाने क्रीडा पर्यवेक्षक यांनी आराखडा तयार करून द्यावा’, अशा सूचनाही या वेळी करण्यात आल्या. महापालिकेच्या नऊ इनडोअर व्यायाम शाळेत अद्ययावत व्यायाम शाळा साहित्य बसविण्यात येणार आहे. अद्ययावत साहित्य बसविण्यासाठी नऊ व्यायाम शाळेची क्रीडा पर्यवेक्षक यांनी पाहणी करून आवश्यक ती स्थापत्य व विद्युत विषयक कामे पूर्ण करून घेण्याच्या सूचवाही बैठकीत देण्यात आल्या. या व्यायाम शाळेतील नादुरुस्त व्यायाम साहित्य भांडार विभागात जमा करणे  व वापरता येण्या जोगे व्यायाम साहित्य इतर व्यायाम शाळेत स्थलांतर करणेचा आदेश लवकच काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.