Pimpri: महापालिका तिजोरीत जूनअखेर 228 कोटींचा महसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत सन 2019-2020 या आर्थिक वर्षात जूनअखेर सुमारे 1 लाख 97 हजार 742 मालमत्ताधारकांनी 228.23 कोटीचा भरणा केलेला आहे. त्यामध्ये 126.85 कोटी रकमेचा ऑनलाईन भरणा झाला आहे. सवलत योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

महापालिकेतर्फे मिळकतकर सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 जून 2019 पूर्वी मिळकत कराची थकबाकीसह दोन्ही सहामाहीचे संपूर्ण बिलांची रक्कम भरणा करणा-या मिळकतधारकांना सामान्य करातील सवलत योजना लागू करण्यात आली होती. 16 करसंकलन विभागीय कार्यालय, महापालिकेची 8 क्षेत्रिय कार्यालये संकेतस्थळावर ऑनलाईन पेमेंट गेट-वे द्वारे मिळकतकराचा भरणा स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

  • सवलतीच्या कालावधीमध्ये सुमारे 1 लाख 8 हजार 22 मिळकतधारकांनी कॅशलेस (ऑनलाईन) सुविधेचा वापर करुन रुपये 126.85 कोटी रकमेचा मिळकत करापोटी भरणा केला आहे. 8 हजार116 महिलांनी 6.59 कोटी, 580 दिव्यांग मिळकतधारकांनी 40 लाख, 2 हजार 269 माजी मैनिकांनी 1.73 कोटी, 12 शौर्यपदक सैनिकांनी 30 हजार रुपयांचा भरणा केला आहे. 1 एप्रिल ते 30 जून अखेर 1 लाख 97 हजार 742 मिळकतधारकांनी एकूण 228.23 कोटी मिळकतकराचा भरणा केला आहे. गतवर्षी सन 2018-2019 मध्ये 1 लाख 72 हजार 726 मिळकतधारकांनी 18.68 कोटी रुपयाचा भरणा केला होता.

दरम्यान, सन 2019-2020 या आर्थिक वर्षाकरिता 582.00 कोटी अंदाजपत्रक वसुली उद्दिष्ट देण्यात आले असून 30 जून 2019 अखेर 228.23 कोटी रुपये वसूली करण्यात आले आहे. मिळकत कराचा ऑनलाईन ‘भरणा करणा-या मिळकतधारकांना सर्वसाधारण (चालू वर्षाचे मागणीतील सामान्य करात) करात 2% सवलत लागू राहील.

  • मिळकतधारक /भोगवटादार यांनी 30 सप्टेंबरअखेर पहिल्या सहामाही अखेरची थकबाकीसह संपूर्ण रक्कम भरुन शास्ती/व्याज रक्कमेची आकारणी टाळावी, असे आवाहन कर संकलन विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.