_MPC_DIR_MPU_III

Pimpri : नगरसेवक जाणार जयपूर, इंदौर दौ-यावर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व नगरसेवक जयपूर (राजस्थान) आणि इंदौर (मध्यप्रदेश) येथे अभ्यास दौ-यासाठी जाणार आहेत. तेथील स्थानिक महापालिकांनी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविलेल्या विविध योजना, प्रकल्पांची पाहणी नगरसेवक करणार आहेत. महापालिकेच्या आठ क्षेत्रीय समितीनिहाय हे दौरे काढण्यात येणार असून प्रत्येकी सहा लाख याप्रमाणे या दौ-यासाठी एकूण 48 लाख रूपये खर्च होणार आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

महापालिकेचे आठ क्षेत्रीय समिती सदस्य म्हणजेच 128 नगरसेवकांसह 24 क्षेत्रीय समिती स्वीकृत सदस्य आणि महापालिकेचे अधिकारी या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. राजस्थानातील उदयपूर, जयपूर आणि मध्यप्रदेशातील इंदोर येथे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्थानिक महापालिकांनी राबवलेले कचरा विल्हेवाट, शाळांमधील स्वच्छता प्रकल्प, पर्यटन स्थळावरील स्वच्छता नियोजन आदी विविध योजना आणि प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.

त्या महापालिकांनी राबविलेल्या चांगल्या योजना, प्रकल्पांची पिंपरी – चिंचवड महापालिकेत अंमलबजावणी करता येईल का, यावर अभ्यास करण्यात येणार आहे. या दौ-यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय निहाय सहा लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार, आठ क्षेत्रीय समिती सदस्यांसाठी एकूण 48 लाख रूपये खर्च होणार आहे. या खर्चास बुधवारी (दि. 8) झालेल्या स्थायी समिती सभेत आयत्या वेळी मान्यता देण्यात आली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.