Pimpri: पालिकेचा पूरनियंत्रण कक्ष सज्ज; आपत्कालीन वेळी कक्षासी संपर्क साधण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पवना धरण व महापालिका परिसरामध्ये सातत्याने पाऊस चालू आहे. पवना धरण 100 टक्के भरले असून धरणातून दररोज पाण्याचा विसर्ग चालू आहे. याच्या एकत्रित परिणामामुळे नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह नेहमीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नदीकाठावरील वस्त्यांमधील नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. या अनुषंगाने पालिकेच्या सर्व संबंधित विभागांना त्यांच्याकडील यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष तसेच क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पूरनियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले असून नागरिकांनी या केंद्राशी संपर्क साधावा असे, आवाहनही त्यांनी केले.

दूरध्वनी क्रमांक मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष 020 -67331556 व 39331456 , मुख्य अग्निशमन केंद्र 101, 020- 27423333, 020-27422405, 9922501475 , ‘अ’ क्षेत्रिय कार्यालय 020- 27656621, 27641627, 9922501453, 9922501454, ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय 020 – 2750153, 9922501455, 9922501456, ‘क’ क्षेत्रिय कार्यालय 020-27122969, 9922501457, 9922501458, ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय 020 – 27277898, 9922501459, 9922501460, ‘इ’ क्षेत्रिय कार्यालय 020- 27230410, 27230412, 8605722777 ‘फ’ क्षेत्रिय कार्यालय 020 – 27650324, 8605422888, ‘ग’ क्षेत्रिय कार्यालय 7787868555, 7887879555, ‘ह’ क्षेत्रिय कार्यालय 020-27142503, 9130051666, 9130050666

आपत्ती व्यवस्थापनाबाबज आज (मंगळवारी)अधिका-यांची बैठक झाली. अधिका-यांनी आपली यंत्रणा अधिक सुसज्ज ठेवण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त गावडे यांनी दिल्या आहेत. यावेळी शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता अय्युबखान पठाण, प्रशासन अधिकारी (शिक्षण समिती) ज्योत्स्ना शिंदे, आपत्ती व्यवस्थापन सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, आशा राऊत, विजय खोराटे, श्रीनिवास दांगट, मनोज लोणकर, मंगेश चितळे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, संदेश चव्हाण, दीपक सुपेकर, देवन्ना गटटूवार, संजय भोसले, शशिकांत मोरे, प्रवीण घोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, वायरलेस इन्चार्ज थॉमस नरोना, आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी उपस्थित होते.

पूर परिस्थीती मध्ये नागरिकांनी एकमेंकाना सहकार्य करुन प्रशासनास सहकार्य करावे, नदीकाठच्या क्षेत्रातील रहिवाशांनी सतर्क राहून स्वतःहून पर्यायी ठिकाणी अथवा संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरीत होऊन जीवित व वित्त हानी टाळावी, पावसाळयात ओल्या रस्त्यावरुन विशेषःत वळणावर वाहन नियंत्रित वेगाने व सावकाश चालवावे. पावसापासून बचाव करण्यासाठी झाडे तसेच पडक्या इमारती, भिंती, जाहिरात फलक, मोबाईल टॉवर यांच्या जवळपास थांबू नये. विजा चमकताना झाडाखाली थांबू नये. घरातील वीजवाहक तारा तसेच विदयुत उपकरणे यांची तज्ज्ञांकडून तपासणी करुन घ्यावी. पावसात रस्त्यावरील वीजवाहक तारा, विजेचे खांब, डी. पी. बॉक्स, फीडर बॉक्स, इत्यादी विद्युत वाहक ठिकाणी संपर्कात येऊ नये. तसेच अशा ठिकाणी जनावरांना जाऊ देऊ नये व बांधू नये.

रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातून, नाल्यातून आणि पुलावरुन पाणी वाहत असताना जाऊ नये. पुराच्या पाण्यात पोहू नये. पावसाळयात पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी वास्तव्य करु नये. औदयोगिक क्षेत्रात उघडयावर रासायनिक पदार्थांचा साठा करु नये. अशा ठिकाणी पाण्याचा संपर्क आल्यास दुर्घटना संभवू शकतात. त्यामुळे त्यापासून नागरिकांनी जपून रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.