Pimpri : महापालिका कर्मचा-यांना मतदानासाठी सोमवारी सुट्टी

अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वेळेत सवलत

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात आली आहे. तर, अत्यावश्‍यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी वेळेत सवलत देण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी पुढील सोमवारी (दि. 21) मतदान होणार आहे. या दिवशी सरकारी तसेच खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी जाता यावे यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार, महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुट्टीचे परिपत्रक काढले आहे.

महापालिकेचे सुमारे साडेआठशे कर्मचारी निवडणुकीच्या कामकाजासाठी वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरीत तसेच अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांनी योग्य ते नियोजन करुन त्यांना वेळेत सवलत द्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.