BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : महापालिकेचा पर्यावरण अहवाल तयार, महासभेसमोर सादर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2018-19 या वर्षातील पर्यावरण अहवाल तयार केला असून 20 ऑगस्ट रोजी होणा-या महासभेसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. दरम्यान, 31 जुलैपर्यंत पर्यावरण अहवाल सादर करणे बंधनकारक असताना प्रशासनाने एका महिन्याच्या विलंबाने अहवाल सादर केला आहे.

शहरातील विविध भागातील हवा, ध्वनी, जल प्रदूषणाची शास्त्रीयदृष्ट्या चाचणी करून नागरिकांना प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी वातावरण तयार करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने सर्वच महापालिकांना 31 जुलैपूर्वी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे बंधन घातले आहे.

महापालिका क्षेत्राचा विकास साधताना पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक असते. पालिकेच्या मूलभूत व पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा, प्राणी व वनसंपदा, विरंगुळ्याची साधने, हवा, पाणी, ध्वनीप्रदूषण आदीचा अभ्यास करून पर्यावरण अहवाल तयार केला जातो. त्यातून लोकजागृती हा एक उद्देश आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा उहापोह झाल्यास काही बाबींवर नियंत्रण आणता येते.

पर्यावरणातील विविध घटकांचा अभ्यास आणि त्याचे प्रमाणबद्ध मूल्यांकन करून दरवर्षी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर केला जातो. तो 31 जुलैअखेर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. परंतु, पिंपरी महापालिकेने एक महिना विलंबाने पर्यावरण अहवाल सादर केला आहे. 20 ऑगस्ट रोजी होणा-या महासभेसमोर अहवाल सादर केला आहे. महासभेत त्यावर चर्चा होणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like