Pimpri: महापालिकेच्या गणेशोत्सव स्पर्धेचे शुक्रवारी बक्षीस वितरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महालिकेच्या वतीने सन 2017 मध्ये सार्वजनिक गणेश मंडळांसाठी घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण येत्या शुक्रवारी (दि.21) चिंचवड येथे होणार आहे.

चिंचवड, येथील अॅटो क्लस्टर सभागृहात दुपारी चार वाजता महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या बक्षीस वितरण सोहळ्यास खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सण, उत्सवाबाबत न्यायालयीन निर्णयामुळे खर्चावर मर्यादा आल्याने पिंपरी महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण अद्याप केले नाही. पालिकेच्या खर्चातून सण, उत्सव साजरे करण्यास न्यायालयाच्या निर्णयामुळे अडथळा आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे विलंब झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या खर्चातून नव्हे तर महापौरांच्या पुढाकारतून भाजप स्वत: हा कार्यक्रम करत असल्याचे, सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.