Pimpri: महापालिकेला बांधकाम परवानगीतून 510 कोटी रुपयांचे उत्पन्न

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला 2018-19 या आर्थिक वर्षात बांधकाम परवानगीतून भरीव उत्पन्न मिळाले आहे. 31 मार्चअखेर महापालिकेला 510 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम विभागाला 455 कोटी रुपये उत्पन्नाचे उदिष्ट होते. विभागाने ते पूर्ण केले असून 55 कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळविले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांत नवीन बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील विविध भागांमध्ये नवनवे गृहप्रकल्प सुरू झाले आहेत. हक्काचे घर आणि गुंतवणूक, अशा दोन उद्देशाने घरे खरेदी केली जात आहेत. पुनावळे, ताथवडे, वाकड भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प झाले आहेत. त्याचबरोबर मोशी, च-होली परिसरात देखील गृहयोजना झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या उत्पन्नात भर पडली आहे.
2018-19 या आर्थिक वर्षात बांधकाम परवानगीतून भरीव उत्पन्न मिळाले आहे. 31 मार्चअखेर महापालिकेला तब्बल 510 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

गेल्या नऊ वर्षात मिळालेले उत्पन्न

बांधकाम विभागाला 2009-10 या आर्थिक वर्षात 107.32 कोटी, 2010-11 मध्ये 126.48 कोटी, 2011-12 मध्ये 190.24 कोटी, 2012-13 मध्ये 261.15 कोटी, 2013-14 मध्ये 334.33 कोटी, 2014-15 मध्ये 239.03 कोटी, 2015-16 मध्ये 364.19 कोटी, 2016-17 मध्ये 351 कोटी, 2017-18 मध्ये 399 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर, 2018-19 या आर्थिक वर्षात 510 कोटी उत्पन्न मिळविले आहे.

याबाबत बोलताना सह शहर अभियंता राजन पाटील म्हणाले, ”बांधकाम परवानगी विभागाला 2018-19 या आर्थिक वर्षात 510 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुनावळे, ताथवडे, वाकड या भागात 25 ते 30 एकरामध्ये मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. हा परिसर मुंबई-पुणे महामार्गाला जोडून आहे. त्यामुळे त्या परिसरात गृहप्रकल्पाची संख्या वाढली. त्याचबरोबर मोशी, च-होली परिसरात देखील गृहयोजना झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या उत्पन्नात यंदा दरवर्षीपेक्षा अधिक भर पडली आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.