Pimpri: खबरदारीचा उपाय म्हणून ‘एच 1, एन 1’ ची लस टोचून घ्या; पालिकेचे आवाहन

अतिजोखमीच्या रुग्णांना पालिकेतर्फे मोफत लस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंडवड शहरात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये एच 1, एन 1 प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून एच 1, एन 1 ची लस टोचून घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले. तसेच लस रुग्णांना देण्याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी रुग्णालयांना दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्ल्युने पुन्हा डोकेवर काढले आहे. आजपर्यंत 11 जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णांनी दक्षात घेण्यात यावी. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील गरोदर माता, अतिजोखमीचे रुग्ण त्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा रुग्णांना महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये एच 1, एन 1 प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या रुग्णांना पालिकेमार्फत मोफत लस दिली जाणार आहे. एच 1, एन 1 ची लस खासगी रुग्णालयातून 650 ते 700 रुपयांना मिळते.

पालिकेच्या रुग्णालयामध्ये जाऊन एच 1, एन 1 प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. शहरातील नागरिक, रुग्णांना लस त्वरित देण्याची दक्षता घ्यावी. तसेच सर्व नागरिकांनी खबरदारी म्हणून एच 1, एन 1 प्रतिबंधात्मक लस खासगी रुग्णालये, दवाखान्यातून टोचून घ्यावी. सध्या बाजारात Panvax, lnfluvac, Vaocigrip इत्यादी लस उपलब्ध आहेत. ही लस वर्षातून एकदा टोचून घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन एच 1, एन 1 आजारावर प्रतिबंध घालण्यास मदत होईल. त्यामुळे शहरातील नागरिकांनी खबरदारी म्हणून लस टोचून घ्यावे, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉय यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.