Pimpri: ‘डिजिटल पेमेंट’मध्ये पिंपरी महापालिका राज्यात प्रथम

एमपीसी न्यूज – डिजिटल पेमेंटमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. डिजिटल पेमेंटमध्ये सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेतील सर्व कर्मचारी व अधिका-यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने केले जाते. त्यासाठी बॅकेने सर्वांना एटीएम आणि डेबिट कार्ड उपलब्ध करून दिले आहेत. तसेच महापालिकेतील सर्व कर्मचारी आणि अधिका-यांना आपले सर्व आर्थिक व्यवहार रोखीने, धनादेश किंवा डीडीद्वारे न करता ऑनलाईन डिजिटल पद्धतीने करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे डिजिटल पेमेंटमध्ये पिंपरी – चिंचवड महापालिका राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रत्येक सरकारी कार्यालय डिजिटल झाले पाहिजे, अशा सक्त सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यासाठी 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यादृष्टीने पिंपरी महापालिकेने महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. तसेच स्मार्ट सिटी कार्यालयामार्फत होणारे सर्व व्यवहार 100 टक्के डिजिटल करण्यात आले आहेत. दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही, याचा दर महिन्याचा अहवाल केंद्र सरकारला पाठविला जात आहे.

डिजिटल पेमेंटमध्ये सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेतील सर्व कर्मचारी व अधिका-यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने केले जाते. त्यासाठी बॅकेने सर्वांना एटीएम आणि डेबिट कार्ड उपलब्ध करून दिले आहेत. तसेच महापालिकेतील सर्व कर्मचारी आणि अधिका-यांना आपले सर्व आर्थिक व्यवहार रोखीने, धनादेश किंवा डीडीद्वारे न करता ऑनलाईन डिजिटल पद्धतीने करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे डिजिटल पेमेंटमध्ये पिंपरी – चिंचवड महापालिका राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. महापालिकेचे तत्कालीन मुख्य लेखापरीक्षक राजेश लांडे यांनी केलेल्या सुधारणांमुळे डिजिटल पेमेंटमध्ये महापालिकेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. दरम्यान, पुणे महापालिका द्वितीय, नाशिक महापालिका तृतीय, तर सोलापूर महापालिका चौथ्या स्थानावर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.