Pimpri: शहरातील 615 गृहसंस्थांना महापालिकेच्या नोटीसा

एमपीसी न्यूज – दैनंदिन शंभर किलो कचरा निर्माण करणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील गृहसंस्था आणि पाच हजार चौरस मीटर भूखंडावर वसलेल्या एकूण 615 गृहप्रकल्पांना महापालिकेने कचरा वर्गीकरणाबाबत नोटीसा बजाविल्या आहेत. गृहसंस्थानी निर्माण होणाऱ्या ओला कच-यावर प्रक्रिया करावी. अन्यथा कचरा उचलला जाणार नाही. याच्या अमंलबजावणीमध्ये चालढकल केल्यास महापालिकेकडून कचरा स्वीकाराला जाणार नाही. तसेच दंडाची आकारणी केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील सोसायट्यांनी त्यांच्याकडे निर्माण होणारा सुका व ओला कचरा वेगवेगळा करून त्यावर प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार आणि सरकारच्या एप्रिल 2017 च्या निर्णयानुसार आपले घर, परिसर, व्यवसाय आदी ठिकाणी उत्पन्न होणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे सर्वांना बंधनकारक आहे. दररोज शंभर किलोग्रॅम अथवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण करणा-या संघटित संस्था व सोसायट्यांनी ज्यांचे क्षेत्र पाच हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आहे. त्यांनी कचरा निर्मितीच्या ठिकाणी कच-याचे वर्गीकरण करून स्वतः ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी निश्‍चित केलेली आहे. त्यासाठी आवश्‍यक यंत्रणा उभारून फक्त सुका कचरा महापालिकेकडे देण्याबाबतची माहिती देण्याची मुदत 29 सप्टेंबरपर्यंत होती.

तरीही बहुतांश सोसायट्यांनी ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना केली नसल्याचे प्रशासनाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. हा प्रकार घनकचरा व्यवस्थापन नियमातील तरतुदींचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे महापालिकेने असा 615 गृहसंस्थांना नोटीसा दिल्या आहेत. गृहनिर्माण सोसायटीत निर्माण होणा-या कच-याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करून ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ती कार्यान्वित करावी. त्याबाबतची माहिती लेखी स्वरुपात कळवावी, असे नोटीसीत नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.