Pimpri: वीस हजार मालमत्ताधारकांकडे 920 कोटी थकीत!

शास्तीकरबाधित 13 हजार मालमत्ताधारकांकडे 512 कोटी थकीत

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 19 हजार 142 थकबाकीदारांकडे तब्बल 920 कोटी 18 लाख  रुपये थकित आहेत. त्यामध्ये 9,135 निवासी मालमत्ताधारकांकडे 241 कोटी, बिगरनिवासी 4,898 मालमत्ताधारकांकडे 248 कोटी, मिश्र 2,989 मालमत्ताधारकांकडे 169 कोटी, औद्योगिक 923 मालमत्ताधारकांकडे 45 कोटी, मोकळ्या जमिनी 1,192 मालमत्ताधारकांकडे 215 कोटी रुपये थकित आहे. तर, अवैध शास्तीकर लागू असलेल्या 13 हजार 74 थकबाकीदारांकडे 512 कोटी 31 लाख 72 हजार रुपयांची थकबाकी आहे.  दरम्यान, थकबाकीदारांना महापालिकेने नोटीसा दिल्या आहेत. तसेच करबुडव्या थकबाकीदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील निवासी, बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जमीनी अशा 5 लाख 25 हजार मिळकतीची नोंद करसंकलन विभागाकडे आहे. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. कर संकलन विभागाला यंदा 582 कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी आजअखेर 450 कोटी रुपये कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. लोकअदालतीमधून 40 ते 45 कोटी कर जमा झाला आहे. न्यायप्रविष्ठ असलेल्या मालमत्तांच्या प्रकरणातून महापालिकेला 100 ते 110 कोटी रुपये कर मिळू शकतो.

शहरातील 5 लाख 25 हजार मिळकतींपैकी दरवर्षी वेळेत मिळकत कर भरणाऱ्यांची संख्या 50 ते 60 टक्के असते. या व्यतिरिक्त असंख्य मिळकतधारकांडून कर थकविला जातो. शहरातील अनेक मोठे उद्योग, शैक्षणिक संस्था, शासकीय संस्था आणि राजकीय वरदहस्त असलेल्या नागरिकांकडून करभरणा केला जात नाही. शहरातील 19 हजार 142 मालमत्ताधारकांनी तब्बल 920 कोटी 18 लाख 38 हजार रुपये कर थकविला आहे.

निवासी 1 लाख ते 5 लाखादरम्यान थकबाकी असलेल्या 8 हजार 94 मालमत्ताधारकांकडे 156 कोटी 15 लाख कराची थकबाकी आहे. 5 ते 10 लाखादरम्यान 882 थकबाकीदारांकडे 59 कोटी 74 लाख थकबाकी, 10 ते 25 लाख 144 थकबाकीदारांकडे 19 कोटी 71 लाख, 25 ते 50 लाख 14  थकबाकीदार असून त्यांच्याकडे 4 कोटी 57 लाख आणि 1 कोटीच्या 1 मालमत्ता असून त्याच्याकडे 1 कोटी 7 लाख अशी एकूण 9 हजार 135 निवासी थकबाकीदारांकडे 241 कोटी 26 लाख रुपये थकीत आहेत.

बिगरनिवासी 1 लाख ते 5 लाखादरम्यान थकबाकी असलेल्या 3 हजार 775 मालमत्ताधारकांकडे 79 कोटी 33 लाख थकबाकी आहे.  5 ते 10 लाखादरम्यान 599 थकबाकीदारांकडे 42 कोटी 79 लाख,  10 ते 25 लाख 431 थकबाकीदारांकडे 62 कोटी, 25 ते 50 लाख 57 थकबाकीदार असून त्यांच्याकडे 19 कोटी 27 लाख, 50 लाख ते 75 लाखा दरम्यानमधील 12 थकबाकीदारांकडे 7 कोटी 64 लाख, 75 ते 99 लाख 8 थकबाकीदारांकडे 6 कोटी 98 लाख, 1 कोटीच्या पुढील 16 थकबाकीदारांकडे 30 कोटी 32 लाख थकीत आहेत. एकूण 4898 बिगरनिवासी मालमत्ताधारकांकडे 248 कोटी 37 लाख रुपये थकीत आहेत.

मिश्र मालमत्ता 1 ते 5 लाखादरम्यान 2148 थकबाकीदारांकडे 48 कोटी 97 लाख, 5 ते 10 लाख 497 मालमत्ताधारकांकडे 35 कोटी 27 लाख, 10 ते 25 लाख 274 मालमत्ताधारकांकडे 42 कोटी 30 लाख, 25 ते 50 लाख 52 मालमत्ताधारकांकडे 17 कोटी 22 लाख, 50 ते 75 लाख 17 मालमत्ताधारकांकडे 7 कोटी 82 लाख, 75  ते 99 लाख 2 मालमत्ताधारकांकडे 1 कोटी 59 लाख, 1 कोटीच्या पुढील 3 मालमत्ताधारकांकडे 15 कोटी 92 लाख थकीत आहेत. अशा 2989 मिश्र मालमत्ताधारकांकडे 169 कोटी 13 लाख रुपये थकीत आहेत.

औद्योगिक 1 ते 5 लाखादरम्यानच्या 630 मालमत्ताधारकांकडे 15 कोटी 20 लाख, 5 ते 10 लाख 185 मालमत्ताधारकांकडे 12 कोटी 98 लाख, 10 ते 25 लाख 101 मालमत्ताधारकांकडे 15 कोटी 3 लाख, 25 ते 50 लाख 6 मालमत्ताधारकांकडे 2 कोटी 11 लाख, 50 ते 75 लाखादरम्यानच्या 1 मालमत्ताधारकाकडे 63 लाख रुपये थकीत आहेत. असे 923 मालमत्ताधारकांकडे 45 कोटी 98 लाख थकीत आहेत. तर, मोकळ्या जमिनी असलेल्या 1192 मालमत्ताधारकांकडे 215 कोटी 18 लाख रुपये थकीत आहेत. इतर 5 मालमत्ताधारकांकडे 24 लाख रुपये थकीत आहेत.

शास्तीकरबाधित 13 हजार मालमत्ताधारकांकडे 512 कोटी थकीत

महापालिका क्षेत्रात 4 जानेवारी 2008 नंतर झालेल्या अवैध बांधकामांना शास्तीकर लागू करण्यात आला आहे. 86 हजार 412 अवैध मालमत्तांना शास्तीकर आकारण्यात आला आहे. त्यामधील निवासी 7 हजार 620 थकबाकीदारांकडे 211 कोटी 78 लाख, बिगरनिवासी 2652 थकबाकीदारांकडे 141 कोटी 76 लाख, मिश्र 2184  थकबाकीदारांकडे 122 कोटी 48 लाख, औद्योगिक 615 थकबाकीदारांकडे 36 कोटी 21 लाख, इतर 3 थकबाकीदारांकडे 7 लाख थकीत आहेत. अशा एकूण 13 हजार 74 थकबाकीदारांकडे 512 कोटी 31 लाख रुपये थकीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.