Pimpri : जनगणनेचे काम करणाऱ्या महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘थम्ब’मधून सवलत

एमपीसी न्यूज – देशाच्या 2021 च्या जनगणनेच्या कामजाला सुरुवात झाली आहे. पिंपरी महापालिकेने जनगणनेकरिता घरयादी, काल्पनिक नकाशे तयार करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. हे काम 10 मार्चपर्यंत पुर्ण करायचे आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिनांकापासून 10 मार्चपर्यंत बायोमेट्रीक थम्ब प्रणालीमध्ये सवलत देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे.

भारताची जनगणना 2021 च्या कामाला सुरुलाती झाली आहे. जनगणना गटाचे चतु:सीमा न बदलता, पूर्वीच्या नकाशामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता 2021 करिता मुळ गटात, उपगटात घरयादी तयार करणे. मूळ गटातील उपगट तयार करुन काल्पनिक नकाश तयार करणे. या कामासाठी 27 जानेवारी 2020 च्या आदेशाने महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. हे कामकाज 10 मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी या अधिका-यांना 10 मार्चपर्यंत बायोमेट्रीक प्रणालीमध्ये सवलत देण्यात यावी असे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी आयुक्तांना कळविले होते.

त्यानुसार जनगणना कामकाज हे राष्ट्रीय कामकाज असल्याने जनगणना 2021 करिता महापालिकेतील नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून ते 10 मार्च 2020 पर्यंत बायोमेट्रीक थम्ब प्रणालीमधून सवलत देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे. 10 मार्चनंतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशनद्वारे उपस्थिती नोंदविणे, हजेरी पत्रकावर दैंनदिन स्वाक्षरी करणे बंधनकारक राहील, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like