Pimpri : महापालिका वायरलेस यंत्रणेच्या परवाना नूतनीकरणासाठी अधिकाऱ्यांची दिल्लीवारी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दूरसंचार विभागाला तीन वायरलेस फ्रिक्वेंसीज केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयामार्फत पुरविण्यात आल्या आहेत. त्याचे नूतनीकरण 31 डिसेंबर 2019 पर्यंत करण्यात आले आहे. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीपर्यंतचे परवाने नूतनीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकारी दिल्लीला जाणार आहेत.

नूतनीकरणाचे शुल्क डिसेंबर 2019 अखेरपर्यंत देणे आवश्यक आहे. नूतनीकरण शुल्काबाबत योग्य ती माहिती घेण्यासाठी दूरसंचार विभागाचे कार्यकारी अभियंता नरोन्हा थॉमस हे नवी दिल्ली येथे विमानाने जाणार आहेत.

नरोन्हा यांच्या या जाण्या-येण्याचा विमान प्रवास तसेच इतर खर्च आणि तीन परवान्यांच्या नूतनीकरणासाठी लागणा-या शुल्काची रक्कम केंद्र सरकारच्या संचार मंत्रालयाकडे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत या विषयाला आयत्यावेळी मंजुरी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.