Pimpri: थिएटर वर्कशॉप कंपनी आणि महापालिका आयोजित नाट्यस्पर्धा स्थगित

एमपीसी न्यूज –  पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पैस’ रंगमंच येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकपात्री, सांघिक  अभिनय स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.

महिला दिनानिमित्ताने ‘व्यक्त अभिव्यक्ती’ ही स्पर्धा १४ मार्च रोजी घेण्यात येणार होती.  या स्पर्धेसाठी पिंपरी- चिंचवडसह सांगली, सोलापूर, सातारा, नाशिकमधील महिला, मुलींनी स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज भरुन नोंदणी केली आहे.

 स्पर्धेची पुढील तारीख  लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ८६६९२२०६१२  या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.