Pimpri : अस्वच्छता करणा-या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने अस्वच्छता, आरोग्यास अपायकारक परिस्थिती करणा-या आणि डासांची उत्पत्तीच्या ठिकाणाबाबत अशा तीन आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 33 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शहरात अस्वच्छता, डासांची उत्पती करणा-या ठिकाणांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात येत आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पिंपळेसौदाग येथील विवांता रियालिटीमध्ये डास उत्पत्तीचे ठिकाण आढळले. त्यामुळे त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पिंपळेनिलख येथील बालाजी व्हेंचर यांच्यावर आरोग्यास अपायकारक परिस्थिती निर्माण केल्याबाबत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 25 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच अस्वच्छता निर्माण केल्याबाबत तीन व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून तीन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.