Pimpri: महापालिकेने विकास कामे बाजूला ठेवून गरजू नागरिकांना अन्नधान्य द्यावे – विकास डोळस

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूने आपल्या भारत देशाला नव्हे तर जगाला वेठीस धरले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जीवन उधवस्त झाले आहे. लॉकडऊनच्या कालावधीत वाढ झाली आहे. त्यामुळे या काळात एकही  गरजू नागरिक जेवणापासून वंचित राहू नये. यासाठी पिंपरी महापालिकेने वेळप्रसंगी विकास कामे बाजूला ठेवून गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करावे, अशी मागणी भाजप नगरसेवक विकास डोळस यांनी केली आहे.

याबाबत महापौर उषा ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक डोळस यांनी म्हटले आहे की, भारतात कोरोनामुळे लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. आपल्या शहरात कामगारांचे वास्तव्य मोठ्या प्रमणात आहे. अनेकांचे हातावर पोट आहे. काम केले तरच त्यांना रोजगार मिळतो. संचारबंदीमुळे त्यांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपाशी राहण्याची दुर्देवी वेळ आली आहे.

पिंपरी महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. महापालिकेचे बजेट सहा हजार कोटी रुपयांचे आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात काही विकासकामे बाजूला ठेवावीत. त्या रकमेतून महापालिकेने अन्नधान्य खरेदी करावे. शहरातील हातावर पोट असणा-या नागरिकांना त्याचे वितरण करावे, अशी विनंती नगरसेवक डोळस यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.