Pimpri : उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, पाण्याचा वापर नियंत्रित करा

ताथवडेतील उपसा सिंचन शाखेच्या अधिकाऱ्याचे पालिकेला पत्र

एमपीसी न्यूज –पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणात पाणीसाठा कमी आहे. सिंचन, बिगरसिंचन, वहनव्यय बाष्पीभवन इत्यादीचा विचार करता. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. हंगामशेवटी मोठ्या प्रमाणात पाणी कपात करावी लागण्याची शक्यता आहे. आजपर्यंतचा पाणा वापर लक्षात घेता. महापालिकेने पाण्याचा वापर नियंत्रित करावा, असे पत्र ताथवडेतील उपसा सिंचन शाखेच्या शाखाअधिका-याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिकेला पवना धरणातून वार्षिक 4.84 टीएमसी पाणीवापरास सरकारने मंजुरी दिली आहे. पवना धरणातून महापालिका दररोज 480 ते 490 एमएलडी पाण्याचा उपसा करते.

पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिदिन प्रतिमाणशी प्रतिदिन 155.25 लिटर पाणी देणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार 341.55 एमएलडीच पाणी वापर अपेक्षित आहे. परंतु, कालवा समितीमध्ये ठरल्याप्रमाणे 440 एमएलडीच पाणी वापर अनुज्ञेय ठरत आहे. तथापि, महापालिका 490 एमएलडी पाण्याचा वापर करत आहे.

आजमितीस पवना धरणात 160.26 दलघमी (66.49 टक्के) पाणीसाठी शिल्लक आहे. सिंचन, बिगरसिंचन, वहनव्यय बाष्पीभवन इत्यादीचा विचार करता. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. हंगामशेवटी मोठ्या प्रमाणात पाणी कपात करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपर्यंतचा पाणी वापर लक्षात घेता. महापालिकेने लोकसंख्येच्या प्रमाणात 155.25 लिटर प्रतिदिननुसार पाण्याचा वापर नियंत्रित करावा, असे पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.