Pimpri: पालिका स्थायीची 115 कोटीच्या विकास कामांना मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 115 कोटी 90 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील बो-हाडेवाडी येथे 1288 निवासी सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधण्यात येणार असून त्यासाठी येणा-या सुमारे 112 कोटी 18 लाख रुपयांच्या खर्चास, भोसरी स.नं.एक मधील दवाखाना इमारतीसाठी बैठक व्यवस्था करणे व स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 73 लाख 38 हजार रुपयांच्या खर्चास, महापालिका मुख्य कार्यालय व इतर विविध कार्यालयांचे नेटवर्किंगचे दुरुस्ती व देखभाल कामकाज करण्यासाठी येणा-या सुमारे एक कोटी 38 लाख 90 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र संगणक प्रणाली देखभाल दुरुस्ती करण्यासाठी येणा-या सुमारे 22 लाख 41 हजार रुपयांच्या खर्चास, पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडील प्रभाग ‘अ’, ‘ब’ आणि ‘फ’ पंपीग स्टेशनमधील स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 45 लाख 17 हजार रुपयांच्या खर्चास, उद्यान विभागाकडील जिजाऊ पर्यटन केंद्र भाग एक व दोन पार्वती उद्यान चिंचवड देखभाल व संरक्षण करण्यासाठी येणा-या सुमारे 41 लाख 14 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या मिळकतीवर व सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे लावणेत येणा-या हँडबिल्स, कागदी भिंती पत्रके लावून शहराचे विद्रुपीकरण करणा-या जाहिरात धारकांना 750 रुपये प्रती चौरस मीटर इतके प्रशमन शुल्क आकारणेस मान्यता देऊन अंतिम मान्यतेसाठी हा विषय महापालिका सभेकडे पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.