Pimpri: ‘कोरोना’चा मुकाबला करण्यासाठी महापालिकेत नियंत्रण कक्ष

कोरोनासंदर्भातील कामकाजासाठी 67331111, 67331556 संपर्क क्रमांक जाहीर

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. दूर संचार विभागात हा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाकडे कोरोना संदर्भातील कामकाजासाठी 67331111, 67331556 हे दोन नंबर जाहीर केले आहेत.  आकाशचिन्ह परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांची कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूने पिंपरी-चिंचवड शहरात शिरकाव केला आहे. शहरात कोरोनाचे तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये संसर्ग झालेल्या रुग्णांना, नागरिकांना आवश्यक असणारी मदत करण्यासाठी वैद्यकीय विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.  कोरोनाचा अटकावासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

पाचव्या मजल्यावरील  दुरसंचार विभागातून कक्षाचे कामकाज चालणार आहे. त्यासाठी वायरलेस ऑपरेटर गोरक्षनाथ विरकर (99224331011) , श्रीकृष्ण बाबर (9922502150), संजय कांबळे (9552511966) आणि ज्ञानेश्वर शेडगे (9822174095) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेले संदेश, तक्रारी, सरकारचे आदेश अधिका-यांकडे सादर करावेत. महापालिकेसंबंधित माहिती नियंत्रीत अधिका-यांच्या सुचनेनुसार कार्यालयांना कळविण्यात यावी. या कक्षाकडे कोरोना संदर्भातील कामकाजासाठी 67331111, 67331556 जाहीर केले नंबर, सारथीवर नागरिकांकडून कोरोनास आजाराविषयक विचारण्यात येणा-या प्रश्नांची माहिती द्यावी. या कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आकाशचिन्ह परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर (7796162243) यांची कक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे (9922501584), वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे (8888846206) यांच्याकडे समन्वय साधून कामकाज करुन घ्यायचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.