Pimpri : महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील 52 हजार विद्यार्थ्यांना मिळणार ओळखपत्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना आता ओळखपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय महापालिका शिक्षण समितीने घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 105 प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये एकूण 52 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असा दावा शिक्षण समितीने केला आहे. महापालिका शिक्षण विभागामार्फत या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व्हावी, यासाठी अधिक प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीबरोबर त्यांच्या सुरक्षिततेबाबत देखील विविध उपाययोजना आवश्यक आहेत.

त्या अनुषंगाने महापालिकेच्या प्राथमिक शाळातील सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्याचा ठराव महापालिका शिक्षण समितीने 19 सप्टेंबरच्या सभेत मंजूर केला होता. या सदस्य प्रस्तावाला निर्मला गायकवाड या सूचक आणि चंदा लोखंडे अनुमोदक आहेत. या उपक्रमासाठी येणा-या खर्चास मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.