Pimpri: लोकसभा निवडणूक, महापालिकेतील कर्मचा-यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर

7 हजार 982 कर्मचा-यांची दिली माहिती; 3 हजार 816 कर्मचारी अत्यावश्‍यक सेवेतील

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागणी केल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उपलब्ध मनुष्यबळाची माहिती सादर करण्यात आली आहे. एकूण 7 हजार 982 कर्मचा-यांची माहिती विहित नमुन्यात सादर करण्यात आली आहे. त्यामध्ये 3 हजार 816 अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचा-यांचा देखील समावेश आहे. त्यामध्ये 156 दिव्यांग आणि 14 सेवा निलंबित कर्मचा-यांचीही माहिती देण्यात आली आहे.

  • आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी पुणे महापालिकेने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याशिवाय पिंपरी,चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा निवडणूक निर्णय अधिका-यांनी देखील लोकसभा निवडणुकीकरिता कर्मचारी पुरविण्याची स्वतंत्र मागणी केली आहे. त्यामुळे महापालिकेत अपुरे मनुष्यबळ असणार आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करत, यावर मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. त्यावर दोन दिवस वाट पाहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासनाला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी उपलब्ध करुन दिल्या जाणा-या मनुष्यबळाची माहिती एकत्रित संकलीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर कार्यवाही करत महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना आपल्या विभागातून उपलब्ध होणा-या मुनष्यबळाची यादी प्रशासन विभागाला सादर केली. त्यानुसार ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेला सादर करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.