Pimpri : सुट्टीच्या दिवशीही करसंकलन कार्यालये सुरु राहणार

मिळकतकर भरणा करण्याचे महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – आर्थिक 2018-19 हे वर्ष 31 मार्च 2019 रोजी संपत असल्याने नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने सर्व 16 कर संकलन विभागीय कार्यालये सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहेत. 31 मार्चपर्यंत दरररोज कार्यालये सुरु राहणार आहेत. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मिळकत कराचा भरणा केलेला नाही. त्यांनी मिळकतकराचा भरणा करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

नागरिकांच्या सोयीचे दृष्टीने साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीचे दिवशी सर्व करसंकलन विभागीय कार्यालये सुरु ठेवण्यात आली आहेत. मालमत्ताधारकांना कराची रक्कम रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करता येईल. या शिवाय महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर मिळकत कर भरणेकामी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. मिळकत कराचा ऑनलाईन भरणा करणा-या मालमत्ताधारकांना सर्वसाधारण करात 2% सवलत लागू राहील. मिळकत कराचा भरणा करणेकामी मोबाईल ऍपची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील करसंकलन विभागाकडे 5 लाख 6 हजार 927 मालमत्तांची महापालिकेकडे नोंद आहे. त्यापैकी 2,90,316 मालमत्ताधारकांनी 397.50 कोटी मिळकतकराचा भरणा केला आहे. महापालिका हद्दीतील सर्व मालमत्ताधारक / भोगवटादार यांनी 31 मार्च अखेर मिळकत कराचा भरणा करुन दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.