Pimpri: विनापरवाना पोस्टर लावल्यास पालिका आकारणार साडेसातशे रूपये दंड

199

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकती अथवा सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे पोस्टर्स, बॅनर्स अथवा भित्तीपत्रके लावून शहराचे विद्रुपीकरणा-यांकडून प्रती चौरस मीटर 750 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच आरोग्य निरीक्षकांकडून संबंधितावर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचे धोरण महासभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहे.

HB_POST_INPOST_R_A

शहरातील ठिकठिकाणच्या पालिकेच्या मिळकती, रस्त्याच्या कडेला, पुलाचे कठडे, भिंती, विद्युत फिडर आदी ठिकाणी विनापरवाना भित्तीपत्रके, हॅण्डबिल, पोस्टर्स, स्टीकर्स लावले जातात. तसेच, जाहिरातीसाठी रंगकाम केले जाते. त्यामुळे शहर विद्रुप होत आहे. या संदर्भात कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचा सूचना स्थायी समितीने दीड महिन्यांपूर्वीच प्रशासनाला दिल्या होत्या. अखेर त्यासंदर्भात नुकतीच प्रशासनाने कार्यवाही सुरू केली. कारवाईचे अधिकार क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य निरीक्षकास दिले आहेत.

कारवाई करताना किती दंड आकारावा, या संदर्भात स्थापत्य विभागाकडून अहवाल मागविण्यात आला होता. त्यानुसार प्रती चौरस मीटरसाठी 375 रूपये इतका खर्च येतो. त्यावर 375 रूपये दंड (प्रशमन शुल्क) आकारले जाणार आहे. असे एकूण 750 रूपये दंड प्रती चौरस मीटर आकारासाठी वसुल केला जाणार आहे. या आकारापेक्षा कमी पोस्टर, भिंतीपत्रक किंवा स्टीकर्स असल्यास किमान दंड 750 रूपये असणार आहे. दंडासह पोलिसांमध्ये गुन्हेही दाखल केले जाणार आहेत. या निर्णयाला स्थायी समितीने मंजुरी दिली असून अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे शिफारस करण्यात आली आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: