Pimpri : महापालिका नेमणार ‘सोशल मीडिया एक्‍सपर्ट’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर परिवर्तन कार्यालयांतर्गत सोशल मीडिया कॅम्पेनिंगचे काम प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका “सोशल मीडिया एक्‍सपर्ट’ची नेमणूक करणार आहे.

सहा महिने कालावधीसाठी मानधन तत्वावर ही नेमणूक केली जाणार असून त्यासाठी दरमहा सात हजार रुपयांचे मानधन महापालिका मोजणार आहे. सहा महिन्यांसाठी होणारा एकत्रित 4 लाख 20 हजार रुपये खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तयार केला आहे.

तसेच “सोशल मीडिया एक्‍सपर्ट’ नेमणुकीचे अधिकार आयुक्तांना प्रदान करण्यात यावेत, असेही या प्रस्तावात नमूद आहे. आगामी स्थायी समितीच्या सभेपुढे हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.