Pimpri : पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेलेल्या अधिकारी, सामाजिक संस्थांचा महासभेत सत्कार

एमपीसी न्यूज – सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागामध्ये जाऊन सहाय्य करणा-या शहरातील विविध सामाजिक संस्था व अग्निशमन विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांचा सन्मान महासभेत करण्यात आला. महापौर राहुल जाधव यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेता नाना काटे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसचिव उल्हास जगताप आदी उपस्थित होते.

कोल्हापूर व सांगली जिल्हयात आलेल्या नैसर्गिक महापुराने निर्माण झालेल्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशमन विभागातील कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारच्या सोयी, सुविधा उपलब्ध नसताना नैसर्गिक संकटांचा मोठया प्रमाणात सामना करत आपत्तीग्रस्त नागरीकांचे प्राण वाचवून त्यांना अन्न, कपडे, औषधे व जीवनावश्यक साहित्य तसेच जनावरांना चारा पोहचवून मोलाची मदत केली.

महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, अग्निशमन विभागातील सब ऑफिसर प्रताप चव्हाण, ऋषिकांत चिपाडे, अशोक कानडे, नामदेव शिंगाडे, फायरमन कैलास वाघेरे, लक्ष्मण होवाळे, सरोष फुंडे, विशाल जाधव, अमोल चिपळूनकर, चेतन माने, फिटर सदाशिव मोरे, फायरमन बाळासाहेब वैदय, अनिल माने, विकास तोरडमल, विकास नाईक, शहाजी चंदनशिवे, भरत फाळके, कैलास डोंगरे, वाहन चालक रुपेश जाधव, याच प्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, महेशदादा स्पोर्टस फांउडेशन, सहयाद्री सर्च ऍन्ड रेस्क्यु फोर्स, सुरेंद्र शळके, विजय लांडे, बाळासाहेब पाटील, संतोष शेलार, अमोल रणदिवे, बालाजी माने, निलराज माने, गितेश बांगरे, तुषार खताळ, हरपाल जाधव, सागर जांबरे, मंदार सन्नाक, संतोष सन्नाक, विवेक तापकीर, शरद महापुरे, गणेश बो- हाडे, रहमान शेख, मनोज साळवे, सचिन देशमुख, सागर वाढाणे, भास्कर परांजपे, दादासाहेब नजन आदींचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.