Pimpri : यमुनानगर रुग्णालयात आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यमुनानगर रुग्णालयाचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रुपांतरीत करण्यात आले असून त्याचे उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते काल बुधवारी (दि.11) करण्यात आले. या आरोग्यवर्धिनी केंद्राचा नागरिकांना मोठयाप्रमाणावर वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येणार असून रुग्णाकरिता विविध सेवांचा अंतर्भाव यामध्ये असणार आहे.

या कार्यक्रमासाठी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, मनसे गटनेते सचिन चिखले, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, प्रा. उत्तम केंदळे, नगरसदस्या सुमन पवळे,कमल घोलप, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत साळवे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या भोईर, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.

 

या आरोग्यवर्धिनी केंद्रात प्रसुतीपूर्व व प्रसुती पश्चात काळजीपूर्वक माताबाल सेवा, अर्भक व बालक आरोग्य सेवा, लहान व किशोरवयीन मुला-मुलींसाठी आरोग्य सेवा, कुटुंब नियोजन, संतती प्रतिबंध सेवा व इतर प्रजनन व बाल आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत साथरोग सेवा, साध्या संसर्गजन्य रोग तपासणी, उपचार, नियंत्रण व प्रतिबंधाकरीता सेवा याचबरोबर नेत्र व कान-नाक-घसा संबंधित उपचार व किरकोळ आरोग्य सेवा, मौखिक आरोग्य सेवा, वयोवृध्द नागरिकांकरीता आरोग्य सेवा, आपातकालीन आरोग्य सेवा, मानसिक आरोग्य संबंधित सेवांचा लाभ घेता येणार आहे. यावेळी या आरोग्यवर्धिनी केंद्रमार्फत प्रथम वैद्यकीय हेल्थ कार्ड शिवाजी घोडेराव यांना महापौर ढोरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.