Pimpri : पादचारी इसमाचे मोबाईल फोन हिसकावले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असणाऱ्या इसमाचे दोन मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री सव्वा आठच्या सुमारास संत तुकारामनगर पिंपरी येथे घडली.

संदीप हिरालाल मोरे (वय 35, रा. नाशिक फाटा, कासारवाडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास फिर्यादी संदीप संत तुकारामनगर पिंपरी येथील महेश नगर चौपाटीजवळ रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी संदीप आणि सुरज मारुती जाधव यांचे 31 हजार 200 रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.