Pimpri: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांकडून 15 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – शहरात अस्वच्छता करणा-यांविरूद्ध महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली असून ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने राबवण्यात आलेल्या मोहिमेत दोन व्यावसायिकांना पंधरा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. चिखली येथे रस्त्यावर कचरा टाकणा-या ट्रक चालकांकडून दहा हजार रूपयांचा तर उद्यमनगर नेहरूनगर येथे वैद्यकीय वापरातील कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल वायटल हॉस्पिटल यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला.

क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर, मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम. भोसले, आरोग्य निरीक्षक वैभव कांचनगौडार, सचिन जाधव, विक्रम सौदे यांनी ही कारवाई केली.

देहू आळंदी रस्त्यावर चिखली येथील नाल्यालगत असणा-या परिसरात रविवारी सकाळी सफाई कामगार मारुती शिंदे काम करीत होते. त्याचवेळी एम एच 16 – एई 2323 या ट्रक मधून कचरा रस्त्यावर टाकण्याचा प्रयत्न करणा-या वाहनचालकाला त्यांनी पाहिले. त्यानंतर ‘क’ क्षेत्रिय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने दंडात्मक कारवाई करून दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला.

तसेच उद्यमनगर नेहरूनगर येथील वायटल हॉस्पिटल यांच्याकडील वैद्यकीय वापरातील वापरलेले इंजेक्शन सिरींजेस आणि इतर साहित्य रस्त्यावर टाकतांना आढळल्याने त्यांच्यावरही पाच हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.