BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून दहा हजार रुपये दंड वसूल

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या वतीने चिखली परिसरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत सुमारे दोन किलो प्लास्टिक जप्त करुन दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

तसेच उघड्यावर शौचालायास जाणा-या एका नागरिकावर पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी.बी. कांबळे, आरोग्य निरीक्षक वैभव कांचनगौडार, विजय दवाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्लास्टीकच्या वापरावर निर्बंध असल्याने व्यापाऱ्यांनी त्याचा वापर टाळावा असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.