Pimpri : पिंपरी पालिका कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार – आमदार लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचा-यांना अंशदान पेन्शन देण्यात येते. यामुळे या कर्मचा-यांची आर्थिक सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे नवीन व जुन्या कर्मचा-यांमध्ये आर्थिक विषमता निर्माण होत आहे. त्यांचे होणारे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी नवीन परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजना रद्द करुन महानगरपालिकेमध्ये लागू असलेली जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरु करण्यासाठी आपण प्रयत्न करु असे आश्वासन आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने रविवारी (दि. 13) थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालयात कर्मचा-यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे, महासचिव चारुशिला जोशी, नितीन समगीर, मनोज माछरे, आबा गोरे, अतुल आचार्य, महाद्रंग वाघेरे, मुकुंद वाखारे, शिवाजी येळवंडे, अनिल लखन, दिगंबर चिंचवडे, पांडुरंग मस्के, संजय कापसे, रामेश्वर पवार, दिलीप गुंजाळ, सुनिल विटकर, विशाल भुजबळ, महादेव बोत्रे, नंदकुमार घुले, बालाजी अय्यंगार, हनुमंत चाकणकर, सुधीर वायदंडे, गौतम भालेराव, राजाराम चिंचवडे, मोहीद्दीन तांबोळी, उत्तम गंगावणे, नथा मातेरे, प्रितम बावीस्कर, दत्तात्रय ढगे, राकेश चव्हाण, सविता निगडे, सुभाष लांडे, चंद्रकांत कांबळे, निलेश कांबळे, दत्तात्रय हाटकर, उमेश बांदल, यशवंत देसाई, किशोर आठवाल, रमेश लोंढे, धनंजय जाधव, मंगल सातकर यांच्यासह मनपातील सर्वच विभागातील जवळपास शेकडो कर्मचारी उपस्थित होते.

बबन झिंजुर्डे म्हणाले की, दिनांक 9 जानेवारी 2019 रोजी नवीन परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजना लागु असलेल्या कर्मचाऱ्यांनी सदरची योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाकडे अर्ज केल्याने या योजनेतील तरतुदींचा अभ्यास करुन उपरोक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता.

सूत्रसंचालन हनुमंत लांडगे व आभार मनोज माछरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.