Pimpri : पिंपरी मंडईत नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर; प्रशासनाचेही दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगचा नवा उपाय काढला. मात्र या नियमांचे नागरिकांकडून पालन होत नसून आज, बुधवारी (दि. 1) पिंपरी मंडईत नागरिकांनी गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला धाब्यावर बसवून खरेदी केली. या गर्दीकडे पिंपरी चिंचवड महापालिका व पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने करोनाचा प्रसार वाढण्याची भीती आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले आहे. फक्‍त किराणा माल, भाजीची दुकाने आणि अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. मात्र ही खरेदी करतानाही तीन फुटांचे सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मात्र नागरिक सरकारने केलेल्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत आहेत. आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका, असा इशारा सरकाने देऊनही नागरिकांच्या वर्तणुकीत फारसा फरक पडलेला नाही.

रविवार व सोमवारी पिंपरीतील भाजी मंडईत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पिंपरी चिंचवड महापालिका व पोलीस प्रशासनाने मंडई बंद केली होती. मंगळवारी अंशतः मंडईतील दुकाने सुरू असल्याने फारशी गर्दी नव्हती. मात्र बुधवारी सकाळी या मंडईत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यामुळे करोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्‍त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.