Pune : पुण्यात कन्टेन्मेंट झोन वगळून आयटी कंपन्या सुरु करण्यास परवानगी, सोशल डिस्टन्सींगचे पालन अनिवार्य

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे अनेक आयटी कंपन्या  गेले 2 महिने बंद आहेत.   या सर्व आयटी कंपन्यांचे काम घरून सुरु आहे. मात्र, आता पुणे शहरातील कंटोन्मेंंट झोन वगळता इतर भागातील आयटी कंपन्या सुरु करण्यास उद्योग विभागाने परवानगी दिली आहे.

उद्योग विभागाने दिलेल्या परवानगीनुसार, काही अटी आणि शर्तीनुसार सोशल डिस्टन्सचे पालन करत कंपन्या सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुणे शहरात 450 मोठे आणि 1400 लहान आयटी उद्योग आहेत. तर 72 आयटी पार्क असून या कंपन्यांमध्ये साडेचार लाख कर्मचारी काम करतात.

कंपनी कार्यालयात काम करताना एकमेकांना स्पर्श होण्याचा धोका असल्याने आयटी कंपन्यांमध्ये ‘सोशल डिस्टन्सींग’चे पालन करणे गरजेचे असणार आहे.

लाॅकडाऊनमुळे जवळपास सर्वच आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे कंपनी बंद असली तरी कर्मचारी घरूनच काम करत होते. आता या निर्णयानंतर कंपन्या पुन्हा सुरू होणार आहेत.

पुणे महापालिका हद्दीत केवळ अत्यावश्यक सेवा असलेल्या उद्योगांना परवानगी देण्यात आली होती. आता प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणच्या आयटी कंपन्यांनाही परवानगी देण्यात आली.

पुणे शहरात मगरपट्टा, नगर रस्ता, सोलापूर रस्ता, कोथरूड, चांदणी चौक, नांदेड सिटी, रामवाडी परिसर, डेक्कन, नळस्टॉप, पाषाण, बाणेर, कोरेगाव पार्क, खराडी, हिंजवडीसह इतर विविध ठिकाणी आयटी कंपन्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.