Pimpri: किराणा दुकानात गुटखा विकणाऱ्याला अटक

Pimpri: person arrested for Gutka selling in grocery store घनश्याम याचे पिंपरी गावात नुपूर जनरल स्टोअर्स नावाचे किराणा दुकान आहे. या दुकानात आणि घरात आरोपीने बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा ठेवल्याचे आढळून आले.

एमपीसी न्यूज– किराणा दुकानात गुटखा विकणाऱ्या एकावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. दुकानदाराकडून 21 हजार 416 रुपयांचा गुटखा जप्त करत दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.18) दुपारी पिंपरी गाव येथे करण्यात आली आहे.

घनश्याम मुलचंद धनानी (वय 53, रा. अरमान सोसायटी जवळ, पिंपरी गाव) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अरुण श्रीराम धुळे (वय ५५, रा. पौड रोड, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन, साठा, वाहतूक व विक्री करण्यासाठी बंदी घातलेली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त यांनी प्रतिबंधित आदेश काढले आहेत.

घनश्याम याचे पिंपरी गावात नुपूर जनरल स्टोअर्स नावाचे किराणा दुकान आहे. या दुकानात आणि घरात आरोपीने बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा ठेवल्याचे आढळून आले.

अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिसांनी केलेली कारवाईमध्ये एकूण 21 हजार 416 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 188, 272, 273, 328 चे उल्लंघन, अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम 30 (2), (a), 26, (2), (i), 26 (2) (iv), सह वाचन 3 (i) (zz) चे उल्लंघन क 59 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.