Pimpri : चेन्नई एक्सप्रेसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दादर-चेन्नई एक्सप्रेस रेल्वेच्या धडकेत अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 5) रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली.

रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे वय अंदाजे 30 वर्ष आहे. उंची 5 फूट 4 इंच आहे. नाक सरळ, चेहरा उभट, केस काळे, निमगोरा व अंगाने सडपातळ आहे. लाल रंगाचा टी-शर्ट, काळसर रंगाची पॅन्ट घातली आहे. मयत तरुणाच्या उजव्या हाताच्या पोटरीवर इंग्रजीत ‘R’ असे गोंदलेले आहे. तर डाव्या पायात काळा दोरा आहे. संबधित तरुणाबाबत काही माहिती असल्यास पिंपरी रेल्वे पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.