Pimpri : ‘फार्मासिस्ट आपल्या ई-संपर्कात’, डॉ. डी. वाय पाटील फार्मसीतर्फे औषध साक्षरता व समुपदेशन अभियान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, डॉ. डीवाय पाटील इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च महाविद्यालयाने, प्राचार्य डॉ. सोहन चितलांगे यांच्या मार्गदर्शनामध्ये औषध साक्षरता जनजागृती व समुपदेशना साठी ‘फार्मासिस्ट आपल्या ई-संपर्कात’ हे अभियान सुरू केले आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व प्राध्यापक, मार्गदर्शक तत्वानुसार समुपदेशन करतील.

कोरोनाच्या जागतिक संकटकाळामध्ये, वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी टाळेबंदी सुरू आहे. अशा संकट काळामध्ये नागरिकांच्या भावनिक व मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम जाणवत आहेत, त्यामुळे लोक चिंताग्रस्त आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घाबरून न जाता काय काळजी घ्यावी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी.

तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवलेले बहुसंख्य आजार मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात, दमा इ. विविध प्रकारच्या शारीरिक समस्यांमध्ये वेळच्या वेळी औषध घेणे क्रमप्राप्त आहे. नागरिकांनी आरोग्यविषयी काही तक्रारी जाणवल्यास, स्वत:च्या मनाने औषधे घेऊ नयेत.

औषधे ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. या संकटकाळामध्ये फार्मसीस्टवर सुद्धा खूप महत्वाची जबाबदारी आहे. समाजासाठी काहीतरी देणे लागते या भावनेतून औषध साक्षरता जनजागृती व समुपदेशन सुरू करण्यात आले आहे.

औषधांच्या काळजीपूर्वक वापराबद्दल तसेच खालील गोष्टींविषयी मार्गदर्शन करण्यात येईल.
# औषधे सेवन करताना काय काळजी घ्यावी?

# औषधांची घरातील साठवण कशी असावी?

# प्रतिजैविकांच्या ( अॅंटीबायोटिक्स ) वापराबद्दल काय सावधगिरी घ्याल?

# मधुमेह, उच्च रक्तदाब इ. आजारांवरील औषधे वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावीत ?

# आयुर्वेदी,होमिओपॅथी इ. औषधे वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावीत?

# प्रसार माध्यमे व इतरत्र दिसणार्‍या जाहिरातीतील औषधे कोणत्याही सल्ल्याशिवाय घ्यावीत?

# औषधांचे दुष्परिणाम?

याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागरिकांना माहिती व समुपदेशन मिळवण्यासाठी खालील माध्यमातून संपर्क साधता येणार आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या वतीने संकेतस्थळ सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ई- फार्मासिस्ट
डॉ. मारुती शेलार – 9960852989, डॉ. धिरज भोंबे – 8149684404, डॉ. करिश्मा राठी – [email protected],
प्रा. शिवानी सैनानी – [email protected]

संकेतस्थळ-
www.pharmacy.dypvp.edu.in

औषध साक्षरता ई-जनजागृती व समुपदेशन या नाविन्यपूर्ण सामाजिक अभियानासारखे उपक्रम राबविण्याची सद्य स्थितीमध्ये नितांत गरज आहे. सदर अभियानास शुभेच्छा!
– डॉ. सोमनाथ पाटील, सचिव, डॉ. डीवाय पाटील युनिटेक सोसायटी, पुणे

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्व महाविद्यालयांना ‘ई-समुपदेशन’ करण्यासाठी समिती स्थापन करता येईल व त्यातून सर्वसामान्य लोकांना फायदा होईल, तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना समाजासाठी महत्वाची भूमिका निभावण्याची संधी मिळेल!
– डॉ. सोहन चितलांगे, प्राचार्य – डीवाय पीआयपीएसआर, सह-सचिव – राष्ट्रीय फार्मसी शिक्षक संघटना

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.