Pimpri : रवींद्र खेडकर यांना पुणे विद्यापीठाची पीएचडी

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने व्यवस्थापन आणि वाणिज्य विभागांतर्गत रवींद्र खेडकर यांना पीएचडी जाहीर केली आहे. त्यांनी विपणन व्यवस्थान या विषयात संशोधन केले आहे.

रवींद्र खेडकर यांनी विपणन व्यवस्थापन या विषयात संशोधन केले आहे. आज सर्वांच जीवनमान हे डिजिटल क्रांतीने व्यापून टाकले आहे. या तंत्रज्ञानाचा वाढता वापर, याचा परिणाम आपल्या दररोजच्या जीवनमनावर झाला आहे. तसाच तो उद्योग जगतावरही झालेला आहे. विशेषतः सवांद पद्धतीत झालेला सकारात्मक बदल व्यवसाय वाढीतील स्पर्धेसाठी केला जात आहे. मार्केटिंग क्षेत्रातील बदललेली संवाद पद्धती म्हणजेच नव्यानेच उदयास आलेली ‘डिजिटल मार्केटिंग’ या विषयाचा सखोल अभ्यास व त्यातील नवीन पध्दती व त्याचा इ-कॉमर्सवर नेमका होणारा परिणाम यावर प्रकाश टाकणार अत्यंत महत्वपूर्ण संशोधन असल्याच मत विद्यापीठाच्या संशोधन मान्यता समितीने व्यक्त केले.

संशोधनात सर्च इंजिन, सोशल मीडिया, डिजिटल डिस्प्ले ऍड व इ-कॉमर्स वेबसाइट/मोबाईल अँप्लिकेशन हे सद्यस्थितीत वापरले जाणारे आणि इ-बाईंग/विक्रीवर सकारात्मक परिणाम करणारे घटक आहेत. हा संशोधन प्रबंध ग्राहक, लहान दुकांदारापासून ते मोठया उद्योगापर्यंत, सरकारी प्रशासनामधील सेवा, सामाजिक व संस्थात्मक कार्य यातील परिणामकारक संवादासाठी उपयोगी पडणार असल्याचे खेडकर यांनी म्हटले आहे. खेडकर विमाननगर येथील ई-लर्निंग संस्थेचे संचालक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.