Pimpri: कोविड समर्पित ‘वायसीएमएच’ मध्येच भाजपकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, माजी मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात कार्यकर्त्यांची गर्दी

Pimpri: BJP's social distance fuss in 'YCMH' dedicated to Kovid, crowd of activists on former CM's visit

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड समर्पित ‘वायसीएम’ रुग्णालय परिसरात सत्ताधारी भाजपकडून माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौ-यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला. फडणवीस यांच्या दौ-यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. रुग्णालयाच्या पाहणी दरम्यानही फिजिकल डिस्टन्सचे तीन तेरा वाजले होते.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील कोरोना  प्रादुर्भाव परिस्थिती आणि पालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत  फडणवीस यांनी आज (मंगळवारी) दुपारी आढावा घेतला. कोविड समर्पित यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सचे तीन तेरा वाजले होते.

पिंपरीतील वायसीएम रुग्णालय हे कोरोनासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे याठिकाणी फक्त कोरोना रुग्णांना प्रवेश दिला जातो.  पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषयीची माहिती घेण्यासाठी फडणवीस  आले होते. दुपारी साडेबाराची वेळ असल्याने भाजपचे कार्यकर्ते दुपारी बारापासून हॉस्पिटलमध्ये गर्दी करून होते.

फडणवीस यांचे पावणे एकच्या सुमारास आगमन झाले. त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सचा बोऱ्या वाजलेला पाहायला मिळाला.

महापौर उषा ढोरे, भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप , माजी खासदार अमर साबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके,  उपमहापौर तुषार हिंगे, आयुक्त श्रावण हर्डीकर,   अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक बाबू नायर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष  सचिन पटवर्धन, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.