Pimpri : कॅम्पातील अतिक्रमण हटविण्यासाठी कायमस्वरुपी पथक नेमणार – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी कॅम्पात नोंदणीकृत आणि बिगरनोंदणीकृत हॉकर्स आहेत. तर, अनेक व्यापा-यांनी दुकानांसमोरील जागा पैसे देऊन भाड्याने दिल्या आहेत. काही व्यापारी दुकानातील माल रस्त्यावर ठेऊन जागा ताब्यात घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कॅम्पात अतिक्रमण होत असून अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कॅम्पात फे-या घालणारे कायमस्वरुपी पथक नेमण्यात येणार असल्याचे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पिंपरी कॅम्पातील व्यापा-यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसह पथारी व हातगाडीचालकांची अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली. अन्यथा पिंपरी कॅम्प बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यावर टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेत. या व्यापा-यांनी आपल्या दुकानांसमोर ठेवलेल्या आणि विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना कॅम्पातून चालणे देखील मुश्‍किल झाल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे पिंपरी कॅम्पातील व्यावसायिकांच्या अतिक्रमणाचा प्रश्‍न चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”व्यापारी आणि पथारी हातगाडीचालक अशी दोन्ही शिष्टमंडळे भेटली असून त्यांची बाजू जाणून घेतली आहे. भाजीमंडईत नोंदणीकृत आणि बिगरनोंदणीकृत हॉकर्स आहेत. तर, अनेक व्यापा-यांनी दुकानांसमोरील जागा पैसे देऊन भाड्याने दिल्या आहेत. काही व्यापारी दुकानातील माल रस्त्यावर ठेवून जागा ताब्यात घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी कायमस्वरुपी पथक तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे अनधिकृत हॉकर्स बसणार नाहीत. तसेच वाहतूक कोंडी देखील कमी होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.