Pimpri: विधानसभेसाठी पिंपरी, कॅन्टोमेंटसह दहा जागांची ‘आरपीआय’ची मागणी – रामदास आठवले

एमपीसी न्यूज – आगमी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना, मित्र पक्षाची युती निश्चित आहे. या दोन्ही पक्षाकडून मित्र पक्षाला 18 जागा दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)ला दहा जागा मिळाल्या पाहिजेत, अशी आमची मागणी केली आहे. त्यामध्ये पिंपरी आणि पुण्यातील कॅन्टोमेंटची जागा मिळाली पाहिजे.

याबाबतचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र दिले आहे, अशी माहिती आरपीआयचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (शनिवारी)दिली.

  • पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवेचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज (शनिवार) निगडीत उद्‌घाटन करण्यात आले आहे. त्यावेळी आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महापौर राहुल जाधव, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, सुधाकर वारभूवन उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.