Pimpri : व्हायब्रण्ट एच.आर संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात

एमपीसी न्यूज – व्हायब्रण्ट एच. आर.चा चौथा वर्धापन दिन सोहळा माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत विविध गौरव पुरस्काराने देऊन साजरा करण्यात आला. व्हायब्रण्ट एच. आर. हि विविध उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या मनुष्यबळ विकास अधिकाऱ्यांची संस्था असून या संस्थेचा चौथा वर्धापन दिवस नुकताच हॉटेल कलासागर येथे मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी रघुनाथ कुचीक, पुण्याचे अप्पर कामगार आयुक्त (प्र) शैलेंद्र पोळ, उप कामगार आयुक्त विकास पनवेलकर, अप्पर संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, पुणे वि. मा. यादव, व्हायब्रण्ट एच. आर.चे मुख्य सल्लागार आणि मार्गदर्शक ऍड श्रीनिवास इनामती, व्हायब्रण्ट एच. आर.चे कार्यकारी समिती सदस्य आणि एलएलपीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष वकील आदित्य जोशी आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास ‘मुळाशी पॅटर्न’ आणि ‘देऊळबंद’चे निर्माते लेखक कलाकार प्रवीण तरडे हे विषेश पाहुणे उपस्थित होते.

  • यावेळी श्रीनिवास पाटील यांनी बोलताना ते हिंदुस्थान अँटिबायोटेक्स कंपनीत पर्सोनेल अधिकारी (प्र) म्हणून काम करत असताना आलेल्या रंजक अनुभव सांगितले आणि मनुष्यबळ अधिकारी हा उद्योग व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील सुवर्णमध्य साधणारा स्तोत्र असल्याचे सांगितले. संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. प्रवीण तरडे यांनी त्यांच्या खाजगी कंपनीतील व्यवस्थापनातील अनुभवाचा चित्रपट क्षेत्रात अवलंबल्यामुळेच त्यांच्या चित्रपटांना भरघोस यश मिळाल्याचे सांगितले.या कार्यक्रमात मनुष्यबळ विकास, पर्यावरण, सामाजिक, क्रीडा, शिक्षण या क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या व्यक्तीचा व्हायब्रण्ट एच. आर. गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ मोहन उचगावकर, माणिकराव पाटील, संग्रामराजे पवार, वृक्षवल्ली परिवार, निसर्ग राजा मित्र जिवांचे, श्री शिवसह्याद्री संस्था, सहंगामी फौंडेशन, मुंबई डब्बावाले आणि विंग गर्ल दिक्षा दिंडे यांचा समावेश होता. तर एच आर ऑलिम्पियाड साठी इंडस बिझनेस स्कूल आणि बेस्ट एच आर प्रॅक्टिसेस साठी कार्निवल ग्रुप यांना पहिल्या क्रमांक मिळविल्या बद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी ४२९ हुन विविध उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले मनुष्यबळ व प्रशासकीय अधिकारी, शासकीय अधिकारी वर्ग उपस्थित होते. यावेळी मुंबई डब्बेवाले यांचा “मुंबई डबेवाले आणि व्यवस्थापन धडे” याविषयावर डब्बावाला संघटनेचे सरचिटणीस किरण गवांदे यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी मुंबई डब्बेवाले संघटनेचे कार्याध्यक्ष सोपानकाका मरे, अध्यक्ष उल्हासभाऊ मुके, सेक्रेटरी अर्जुन सावंत, खजिनदार अशोक कुंभार आणि सदस्य बाळासाहेब भालेराव आदी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी दीपक खोत, शितल साळुंके, अजय रोपळेकर, अनिल उबाळे, सचिन पवार, अनिल जाधव, अस्लम शेख, संग्राम पाटील, ऋषिकेश दमामे, स्वप्नील पवार, निर्मला जाधव, प्रियांका पारखी, गजानन डफे यांनी विषेश मेहनत घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.